Skip to main content

Posts

Showing posts from November 2, 2009

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..."

व्यक्ती आणि त्यांची परस्पर विरोधी मने यांची सांगड घालणे हे आजच्या राजकारण्यांसाठी प्रमुख आव्हान आहे.राजकारण हा व्ययसाय झाला , त्यात सर्वसामान्यना स्थान नाही अशी ओरड करणार्‍या मध्यम वर्गाला आज आत्म् परीक्षण करण्याची नितांत गरज आहे.अर्थ व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेला स्वतः ला पंढरपेशी म्हणवणारा राजकारणाला शिव्या घालणारा मात्र निवडणुकीचा दिवशी घरी बसणारा हा मध्यम वर्गीय समाज.तसे पाहता योग्य राज्यकर्ते निवण्याची अचूक व योग्य असे काम करण्याची क्षमता याच वर्गात आहे. पण ती वापरली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. शिवाजी महाराज यांचा जय जय कार करताना अवघे आसमंत दनानून सोडणारा हा माझा महाराष्ट्र अटके पार झेंडे लावणारा हा महाराष्ट्र व इथला मराठी माणूस , जो स्वतः ची मान झुकावण्या पेक्षा छाटून घेणे पसंत करायचा , त्याची अवस्था आज काय झालीय ?कुठल्या संभ्रमात आहे तो?त्याच्या मनावर कसले मळभ चढलय त्याच्या ?लोक चंद्रावर जाऊन पोहोचले पण माझ्या या मराठी माणसाला अजुन स्वतः च्याच भूमिसाठी भांडायच येतय.का ह