Skip to main content

Posts

Showing posts from January 23, 2010

"भ्रष्ट झाली मती, अरे कशी विसरता संस्कृती "

नववर्षाचे स्वागत धडाक्यात झाले .नेहमीप्रमाणे ३१ तारखेला तरुणाई सोमरस व तत्सम आनंदामध्ये डूम्बली होती.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण दुसरे काय..बिघडलेली पिढी हा आजकालचा नेहमीचाच चर्चेचा विषय.हि चर्चा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर थांबते कि काय कुणास ठाऊक. मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात असे अनुभव येत आहेत कि जे खरेच विचार करायला लावणारे आहेत. डीजे नाईट ला कपल पासेस ,तोकडे कपडे घालून मुलींचे फिरणे , हे सगळं तसा बघायला खूप मनोरंजक आणि बारा वाटतं .पण जरा विचार केला तर या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल.कॉलेजच्या बाहेरील टपरीवर रोज पडणारा सिगारेट च्या काड्यांचा सडा हा नेहमी पाहण्यात असतो.कसरत करून शरीर कमवायच्या वयात हे शरीरात धूर घेऊन शरीर कसा जाळतात देव जाणे.. डीजे नाईट ला कपल पासेस आणि त्यांची निर्लज्जपणे जाहिरात करून प्रवेश फी ठेवणारे निर्लज्ज आयोजक आणि कहर म्हणजे असल्या गोष्टी महाविद्यालयात करण्यास परवानगी देणारे लोक.असा नंगानाच करून पाश्चात्य संस्कृती रुजवण्याचे कामजर शाळा महाविद्यालये करणार असतील तर मात्र बाब निश्चितच गंभीर आहे. अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला क