Skip to main content

Posts

Showing posts from November 13, 2009

"होय हा लढा आमच्या मराठी अस्मितेचा...."

गेल्या काही दिवसात मराठी अस्मितेचा मुद्धा ऐरणीवर आलाय.गेली कित्येक दशके नुसती नावाला असलेली मराठी अस्मिता गेल्या दोन चार दिवसात अचानक पेटून उठलीय.दहा कोटी जनतेचा हा माझा महाराष्ट्र. सगळ्याना आपलेसे करणारा हा माझा महाराष्ट्र. सहकारची चळवळ फळफळलेला हा महाराष्ट्र.याच माझ्या महाराष्ट्रमधे असे किती तरी बाहेरून लोक आले. कितीतरी या मातीत मुरले.ते आमचेच झाले. अहो पटेल काय आणि पाटील काय..आमचेच दोघे.सगळ्यानाच या मराठी मातीचा लळा.असणे गैर नाही हो. असो जरा पहा माझ्या परीने या मराठी अस्मितेचे विश्लेषण......ज्या शिवाजी महाराजानी या रयतेच्या सुखासाठी,भल्यासाठी दिल्लीच्या तख्तला आव्हान दिले,आणि ते यशस्वीरित्या पेलले. आम्ही सगळे त्याच शिवाजीचे मावळे.शून्यातून मराठी साम्राज्य उभा राहीले.स्वराज्य परकीयांच्या ताब्यात जाणे सोडा शत्रु वाकडी नजर करूनही पाहु शकत नव्हता.ज्या शंभू राजानी औरंगजेबाच्या तोंडाला फेस आणला,तेच आमचे शंभू राजे सिंहाचे जीवन जगले,आणि धर्मासाठी प्राण देखील सोडला,पण धर्म नाही सोडला.......असा आहे आमचा तरुण. म्हणून त्याची छाती अजूनही फुगते राजांचे नाव