Skip to main content

Posts

Showing posts from November 22, 2009

"एका स्वाधीन झालेल्या मनाची गोष्ट..."

 "एखादी खोलवर झालेली जखम ,      वेदनेचा आकंत करणारी जखम ,        आर्त किंकाळी फोडायला लावणारी जखम .          आणि अशा जखमेवर हळुवार मारलेली फुंकर .            ती फुंकर हवीहवीशी वाटणारी , पण क्षणभंगुर ,              वेदनेचा  विसर पाडणारा त्यातला आपलेपणा ."  " माणसाचे आयुष्य अगदी असेच, त्या दुखऱ्या जखमेसारखे.ज्याप्रमाणे ती जखम नकोशी असते तसेच आपले आयुष्य हि आपल्याला बऱ्याचदा नकोसे होते. अशा वेळेस सगळ्या सुखांचा उबग येतो , वीट येतो.तेव्हा गरज असते ती आपल्या कोणाची तरी. मग ती व्यक्ती आपली आई,वडील,मित्र-मैत्रीण,आणि बऱ्याचदा प्रेयसी-प्रियकर कोणीही असते.त्यांच्या सहवासासाठी मन मोहरून जाते."   " एख्याद्याचा लागलेला लळा,एख्याद्याची झालेली सवय,तो तुटताना अनेकदा नरकयातना होतात.ज्यांच्या अंगाखांद्यावर आपले  अवघे बालपण जाते,त्यांच्या पासून विभक्त होताना त्यांच्या डोळ्याती...