Skip to main content

Posts

Showing posts from December 26, 2009

"महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्वाचा पैलू::जातीयवाद"

छत्रपती शिवाजी महाराज , म.फुले ,शाहू  ,डॉ,बाबासाहेब आंबेडकर हे  सगळे  खरे तर महाराष्ट्राची ओळख जगाला करून दिलेले महापुरुष.परंतु यांचा महाराष्ट्र जातीयवादाने कसा पोखरला आहे याचा आढावा घेण्याचा केलेला हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न. मराठी राजकारणावर प्रभाव असलेल्या प्रमुख जातींमध्ये मराठा , OBC , दलित , आणि ब्राह्मण या चार प्रमुख जातींचा समावेश होतो.या सगळ्याच जाती बर्याचदा त्या त्या समाजाच्या नेत्याच्या मागे सक्षमपणे उभा राहिल्या याची बरेच उदाहरणे देता येतील.तसेच या सगळ्या नेत्यांनीही त्या त्या समाजाला आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले.आणि त्यामुळे बर्याच पक्षांवर जातीचा शिक्का मारला गेला. मराठा कार्ड: स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीचे जाळे महाराष्ट्रात विणले गेले.या सहकारी संस्थांवर पहिल्यापासूनच मराठा समाजाचे वर्चस्व राहिले.आजही बरेचसे साखर कारखाने ,सहकारी बँका,संस्था यांचे कार्यकारी मंडळ हे मराठाच असल्याचे लक्षात येते.मराठबहूल प्रदेशात क्वचितच इतर समाजाचा नेता पुढे जाऊ शकला.आणि जरी गेला तरी बर्याचदा मराठा नेत्यांच्या हातातले बाहुले बनून राहिला.मराठा कार्ड वापरून मत