Skip to main content

Posts

Showing posts from July 15, 2011

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिवजयंती ३ वेळा साजरी करतो आपण. यातून