Skip to main content

Posts

Showing posts from November 8, 2009

कुठे जाणार ते ?

कुठे जाणार ते ? परवा कॉलेजला मार्केट यार्ड या परिसरातून जात होतो.घरातून लवकर निघालो होतो .पेपर सुरू असल्यामुळे आणि जरा अभ्यास झाला असल्याने मी जरा खुश होतो. जाताना असताना सहज डावीकडे असलेल्या झोपड पट्टी कडे लक्ष्य गेले . तर त्या झोपड पट्टी मधे एकाने छानसे दुकान थाटले होते. बघून जरा वेगळे वाटले कारण भाग तसा खूपच "स्लम " होता. नंतर कॉलेज ला गेलो .पेपर मधे जरा कौशल्य पणाला लागले. अवघड असल्याने फार काही चमत्कार करत नाही आले . असो .निराश मनाने परत येत होतो. येताना परत त्याच मार्केट यार्ड परिसरात ती घरे नव्हती. अतिक्रमणे म्हणून ती हटवली जात होती. साधारण २०० ते ३०० लोक रस्त्यावर आले होते. कोठून कुन्या गावाचे असतील हे लोक , आता कुठे जाणार , झोपनर कुठे असे एकामागून एक प्रश्न माझ्या मनाला स्पर्श करून गेले.कायद्यात बसणारी नाहीत , रस्त्याची शोभा वा शहराची शोभा यास्थी बाधा असणारी वगैरे सगळे ठीक आहे. पण शेवटी ती पण माणसेच आहेत ना? ती गरीब घरात जन्मली , किंवा कुठे तरी कमी पडली म्हणून त्याना कुत्र्याची पण किंमत नाही का? निष्ठुर पणे त्यांच्या घरावर चालणारे रोलर पाहून मन सुन्न झाले. त्या कुट