Skip to main content

Posts

Showing posts from March 23, 2010

"सावित्रीच्या लेकीची बिकट वाटचाल..."

" स्त्री आणि पुरुष .जगाच्या रथाची दोन चाके.यापैकी एक चाक सुसाट वेगाने तर दुसरे जरा डगमगत चालतय या ओरडीतून स्त्री सबलीकरणाचा उगम झाला .माझे नेहमीच एक प्रामाणिक तत्व.कुठल्याही गोष्टीची मीमांसा करत असताना  जरासे त्या गोष्टीशी निगडीत असणाऱ्या इतिहासात डोकावणे.फार दूर नाही पण स्वातंत्र्य पूर्ण काळात जाऊ. सतीची पद्धत,अज्ञानाच्या तिमिरात आकंठ बुडालेली,चूल मुल बघणारी .नाते काय असते हे कळायच्या आधीच विवाहाच्या जबाबदारीत अडकलेली एक तरुणी समोर येते.तिची ती अवस्था ज्यात तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, सगळ्यांची उठाठेव करताना तिची उडणारी तारांबळ, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अपवादानेच आढळणारी ती माऊली.पती जर चांगला असेल तर ठीक,नाहीतर तिची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच अगदी.एखादीचा पती जर दगावला तर तिचे सती जाने , विवाह झाल्यानंतर जर अशी वेळ एखादिवर आली तर मात्र कळी उमलायच्या आतच कोमेजणे अथवा उलट्या काळजाच्या सामाजिक मनोवृत्तीने ती कळी कुस्करन्याचा हृदयद्रावक प्रयत्न होत असे.अशातच एखादी कळी हुंगण्याचा झालेला प्रत्यत्न पाशवी मनोवृत्तीची अनुभूती घडवत असे.समाजातील स्त्री वर