"स्त्री आणि पुरुष .जगाच्या रथाची दोन चाके.यापैकी एक चाक सुसाट वेगाने तर दुसरे जरा डगमगत चालतय या ओरडीतून स्त्री सबलीकरणाचा उगम झाला.माझे नेहमीच एक प्रामाणिक तत्व.कुठल्याही गोष्टीची मीमांसा करत असताना जरासे त्या गोष्टीशी निगडीत असणाऱ्या इतिहासात डोकावणे.फार दूर नाही पण स्वातंत्र्य पूर्ण काळात जाऊ.
सतीची पद्धत,अज्ञानाच्या तिमिरात आकंठ बुडालेली,चूल मुल बघणारी .नाते काय असते हे कळायच्या आधीच विवाहाच्या जबाबदारीत अडकलेली एक तरुणी समोर येते.तिची ती अवस्था ज्यात तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, सगळ्यांची उठाठेव करताना तिची उडणारी तारांबळ, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अपवादानेच आढळणारी ती माऊली.पती जर चांगला असेल तर ठीक,नाहीतर तिची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच अगदी.एखादीचा पती जर दगावला तर तिचे सती जाने , विवाह झाल्यानंतर जर अशी वेळ एखादिवर आली तर मात्र कळी उमलायच्या आतच कोमेजणे अथवा उलट्या काळजाच्या सामाजिक मनोवृत्तीने ती कळी कुस्करन्याचा हृदयद्रावक प्रयत्न होत असे.अशातच एखादी कळी हुंगण्याचा झालेला प्रत्यत्न पाशवी मनोवृत्तीची अनुभूती घडवत असे.समाजातील स्त्री वर्गाच्या समस्या या समाजातील जातीच्या उतरंडी नुसार त्यांची कमी अधिक तीव्रता जाणवत असे.
पहिली रणरागिणी , जिचे योगदान आणि कार्याला येणाऱ्या शेकडो पिढ्या वंदन करत राहतील अशा सावित्रीबाई फुले.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्यासवे रोवली.सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या.समाज प्रबोधनाचा उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण.एखाद्यावर जर अन्याय होत असेल त्याची आधी जाणीव व्हावी लागते.त्या जाणीवेतून चीड निर्माण होते.आणि मगच क्रांती घडते.स्त्री सबलीकरणाची ठिणगी तर एकोणिसाव्या शतकातच पडली , वणवा पेट घेणारच होता.
साधारणपणे जिथे जिथे पुरुषी मनोवृत्तीला आव्हान दिले गेले ,तिथे तिथे स्त्रियांवर होणारा अन्याय व त्यांचा द्वेष वाढत गेला. पण जेव्हा जेव्हा स्त्रीला हीन लेखून तिच्या मार्गात अडथळे आणले गेले ,तो प्रत्येक प्रसंग म्हणजे सावित्रीच्या अंगावर दगड फेकण्याचाच प्रकार होता.हुंडा,बालविवाह जरी कायद्याने निषिद्ध असले तरी या गोष्टी सर्रासपणे होताना आढळतात.नात्यामध्ये निर्माण होणारी तेढ , अवघडलेपणा , हुंडाबळी असले परिणाम भोगावे लागतात.

आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, सत्ताधारी पक्षाच्या सर्वेसर्वा महिला (या तर विदेशी),विरोधी पक्षनेत्या महिला , १०-१५ महिला खासदार आहेत तरीपण महिला अजूनही सबला नाही कारण - "अखंड पुरुषी मनोवृत्तीच्या समुद्रात नुसते हिमनगाचे टोक बाजूला जाऊन चालणार नाही तर सगळा हिमनग बाजूला काढावा लागेल."
कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ त्या क्षेत्रात जाणाऱ्या नवोदितांच्या मनात एका अनाम भीतीला घर करून देते.जेसिका लाल खून प्रकरण संपूर्ण व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले.काही वर्षांपूर्वी धनंजय चटर्जी नावाच्या डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून केलेला खून अजूनही स्मरणात आहे.एकतर्फी प्रेम , त्यातून होणारी हिंस्त्र मनोवृत्ती ,कुमारी माता ,बलात्कार , खून यांनी वर्तमानपत्राचे रकाने भरून वाहतात.
स्त्री म्हणजे वापरण्याची वस्तू हि संकल्पना परत दृढ होण्याची भीती वाटत राहते.शाळांतून ,महाविद्यालयातून मुलींबरोबर भावी आयुष्याच्या आणाभाका घेऊन त्यांचा वापर करून त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली उदाहरणे पदोपदी आहेत, होती आणि वाढतच जाण्याची भीती वाटते.
इतिहासातील स्त्री आणि आताची स्त्री यांच्या स्थितीत निश्चितच फरक आहे.अंतराळात जाऊन पोहोचलेली स्त्री हि स्त्री सबलीकरणाचे खरे द्योतक आहे.आज ताठ मानेने वागू शकते , वावरु शकते कारण तिला स्वातंत्र्य मिळाले आहे.एवढेच नव्हे तर होणाऱ्या मुलाला स्वतःचे नावही देऊ शकते.प्रगतीची आस मनात धरून संस्कृतीचा वसा घेतलेली सावित्रीची लेक असावी.तेच खरे अभिप्रेत असलेले स्त्री सबलीकरण आहे.जगाच्या रथाची हि दोन्ही चाके संगतीने धावोत कारण हा रथ Both Wheel Drive असावा कारण जर असे नाही झाले तर जगाचा हा गाडा अडकून पडेल.
असोत.
माधव वणवे.

nice article
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete