Skip to main content

"सावित्रीच्या लेकीची बिकट वाटचाल..."

"स्त्री आणि पुरुष .जगाच्या रथाची दोन चाके.यापैकी एक चाक सुसाट वेगाने तर दुसरे जरा डगमगत चालतय या ओरडीतून स्त्री सबलीकरणाचा उगम झाला.माझे नेहमीच एक प्रामाणिक तत्व.कुठल्याही गोष्टीची मीमांसा करत असताना  जरासे त्या गोष्टीशी निगडीत असणाऱ्या इतिहासात डोकावणे.फार दूर नाही पण स्वातंत्र्य पूर्ण काळात जाऊ.

सतीची पद्धत,अज्ञानाच्या तिमिरात आकंठ बुडालेली,चूल मुल बघणारी .नाते काय असते हे कळायच्या आधीच विवाहाच्या जबाबदारीत अडकलेली एक तरुणी समोर येते.तिची ती अवस्था ज्यात तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, सगळ्यांची उठाठेव करताना तिची उडणारी तारांबळ, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अपवादानेच आढळणारी ती माऊली.पती जर चांगला असेल तर ठीक,नाहीतर तिची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच अगदी.एखादीचा पती जर दगावला तर तिचे सती जाने , विवाह झाल्यानंतर जर अशी वेळ एखादिवर आली तर मात्र कळी उमलायच्या आतच कोमेजणे अथवा उलट्या काळजाच्या सामाजिक मनोवृत्तीने ती कळी कुस्करन्याचा हृदयद्रावक प्रयत्न होत असे.अशातच एखादी कळी हुंगण्याचा झालेला प्रत्यत्न पाशवी मनोवृत्तीची अनुभूती घडवत असे.समाजातील स्त्री वर्गाच्या समस्या या समाजातील जातीच्या उतरंडी नुसार त्यांची कमी अधिक तीव्रता जाणवत असे.

पहिली रणरागिणी , जिचे योगदान आणि कार्याला येणाऱ्या शेकडो पिढ्या वंदन करत राहतील अशा सावित्रीबाई फुले.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्यासवे रोवली.सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या.समाज प्रबोधनाचा उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण.एखाद्यावर जर अन्याय होत असेल त्याची आधी जाणीव व्हावी लागते.त्या जाणीवेतून चीड निर्माण होते.आणि मगच क्रांती घडते.स्त्री सबलीकरणाची ठिणगी तर एकोणिसाव्या शतकातच पडली , वणवा पेट घेणारच होता.

साधारणपणे जिथे जिथे पुरुषी मनोवृत्तीला आव्हान दिले गेले ,तिथे तिथे स्त्रियांवर होणारा अन्याय व त्यांचा द्वेष वाढत गेला. पण जेव्हा जेव्हा स्त्रीला हीन लेखून तिच्या मार्गात अडथळे आणले गेले ,तो  प्रत्येक प्रसंग म्हणजे सावित्रीच्या अंगावर दगड फेकण्याचाच प्रकार होता.हुंडा,बालविवाह जरी कायद्याने निषिद्ध असले तरी या गोष्टी सर्रासपणे होताना आढळतात.नात्यामध्ये निर्माण होणारी तेढ , अवघडलेपणा , हुंडाबळी असले परिणाम भोगावे लागतात.


आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, सत्ताधारी पक्षाच्या सर्वेसर्वा महिला (या तर विदेशी),विरोधी पक्षनेत्या महिला , १०-१५ महिला खासदार आहेत तरीपण महिला अजूनही सबला नाही कारण - "अखंड पुरुषी मनोवृत्तीच्या समुद्रात नुसते हिमनगाचे टोक बाजूला जाऊन चालणार नाही तर सगळा हिमनग बाजूला काढावा लागेल."

कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक छळ त्या क्षेत्रात जाणाऱ्या नवोदितांच्या मनात एका अनाम भीतीला घर करून देते.जेसिका लाल खून प्रकरण संपूर्ण व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले.काही वर्षांपूर्वी धनंजय चटर्जी  नावाच्या डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून केलेला खून अजूनही स्मरणात आहे.एकतर्फी प्रेम , त्यातून होणारी हिंस्त्र मनोवृत्ती ,कुमारी माता ,बलात्कार , खून यांनी वर्तमानपत्राचे रकाने भरून वाहतात.

स्त्री म्हणजे वापरण्याची वस्तू हि संकल्पना परत दृढ होण्याची भीती वाटत राहते.शाळांतून ,महाविद्यालयातून मुलींबरोबर भावी आयुष्याच्या आणाभाका घेऊन त्यांचा वापर करून त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली उदाहरणे पदोपदी आहेत, होती आणि वाढतच जाण्याची भीती वाटते.

इतिहासातील स्त्री आणि आताची स्त्री यांच्या स्थितीत निश्चितच फरक आहे.अंतराळात जाऊन पोहोचलेली स्त्री हि स्त्री सबलीकरणाचे खरे द्योतक आहे.आज ताठ मानेने वागू शकते , वावरु शकते कारण तिला स्वातंत्र्य मिळाले आहे.एवढेच नव्हे तर होणाऱ्या मुलाला स्वतःचे नावही देऊ शकते.प्रगतीची आस मनात धरून संस्कृतीचा वसा घेतलेली सावित्रीची लेक असावी.तेच खरे अभिप्रेत असलेले स्त्री सबलीकरण आहे.जगाच्या रथाची हि दोन्ही चाके संगतीने धावोत कारण हा रथ Both Wheel Drive असावा कारण जर असे नाही झाले तर जगाचा हा गाडा अडकून पडेल.
  

असोत.

माधव वणवे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिव...

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या...

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...