Skip to main content

Posts

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिवजयंती ३ वेळा साजरी करतो आपण. यातून
Recent posts

ती ९० मिनिटे...

"पायावर पायाची टाकून घडी बसली होती अशी बसंतात बहरलेली वेल जशी चेहरा असा जसा खुललेलं नाजूक फुल, तेजानं उमललेलं डोळे असे पाणीदार जसे पहिल्या प्रहरी पानावर अवतरले दवबिंदू त्या दवांत शिरणारी सूर्याची पहिली किरणे, त्यातून उमटणारा लख्ख प्रकाश, तशीच हो अगदी तशीच तुझ्या काळ्याभोर केसांची लकाकी पहावं आणि पहातच राहावं, असा आरस्पानी चेहरा पेपर, "फ्रांस" सगळं काही क्षेम माहित नाही, बहुतेक यालाच म्हणत असतील पाहताक्षणी होते ते प्रेम..."

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत

" बेधुंद इंद्रधनू "

पाऊस येतो आणि जातो... तसा हा मान्सून उद्या नसेल पण हा जाणारा पाऊस बऱ्याच गोष्टी मागे सोडून जातो दोन व्यक्तींमधील फुलत जाणारे प्रेम हे या पावसाळ्यातील ओलाव्यामुलेच असावे कदाचित म्हणूनच कि काय पर्जन्यानंतर येणाऱ्या थंडीत तन -मन -धन सखीच्या उष्ण उसाश्यासाठी जीव तडफडत राहतो आणि जर वेळीच तिने मायेची उब नाही घातली तर वैशाख वणव्यात आयुष्य जळून जाते... असे आहेत पावसानंतर खुलणारया इंद्र धनुचे रंग , अंतरंग , आणि सप्तरंग...

"सावित्रीच्या लेकीची बिकट वाटचाल..."

" स्त्री आणि पुरुष .जगाच्या रथाची दोन चाके.यापैकी एक चाक सुसाट वेगाने तर दुसरे जरा डगमगत चालतय या ओरडीतून स्त्री सबलीकरणाचा उगम झाला .माझे नेहमीच एक प्रामाणिक तत्व.कुठल्याही गोष्टीची मीमांसा करत असताना  जरासे त्या गोष्टीशी निगडीत असणाऱ्या इतिहासात डोकावणे.फार दूर नाही पण स्वातंत्र्य पूर्ण काळात जाऊ. सतीची पद्धत,अज्ञानाच्या तिमिरात आकंठ बुडालेली,चूल मुल बघणारी .नाते काय असते हे कळायच्या आधीच विवाहाच्या जबाबदारीत अडकलेली एक तरुणी समोर येते.तिची ती अवस्था ज्यात तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, सगळ्यांची उठाठेव करताना तिची उडणारी तारांबळ, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अपवादानेच आढळणारी ती माऊली.पती जर चांगला असेल तर ठीक,नाहीतर तिची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच अगदी.एखादीचा पती जर दगावला तर तिचे सती जाने , विवाह झाल्यानंतर जर अशी वेळ एखादिवर आली तर मात्र कळी उमलायच्या आतच कोमेजणे अथवा उलट्या काळजाच्या सामाजिक मनोवृत्तीने ती कळी कुस्करन्याचा हृदयद्रावक प्रयत्न होत असे.अशातच एखादी कळी हुंगण्याचा झालेला प्रत्यत्न पाशवी मनोवृत्तीची अनुभूती घडवत असे.समाजातील स्त्री वर

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या

"भ्रष्ट झाली मती, अरे कशी विसरता संस्कृती "

नववर्षाचे स्वागत धडाक्यात झाले .नेहमीप्रमाणे ३१ तारखेला तरुणाई सोमरस व तत्सम आनंदामध्ये डूम्बली होती.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण दुसरे काय..बिघडलेली पिढी हा आजकालचा नेहमीचाच चर्चेचा विषय.हि चर्चा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर थांबते कि काय कुणास ठाऊक. मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात असे अनुभव येत आहेत कि जे खरेच विचार करायला लावणारे आहेत. डीजे नाईट ला कपल पासेस ,तोकडे कपडे घालून मुलींचे फिरणे , हे सगळं तसा बघायला खूप मनोरंजक आणि बारा वाटतं .पण जरा विचार केला तर या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल.कॉलेजच्या बाहेरील टपरीवर रोज पडणारा सिगारेट च्या काड्यांचा सडा हा नेहमी पाहण्यात असतो.कसरत करून शरीर कमवायच्या वयात हे शरीरात धूर घेऊन शरीर कसा जाळतात देव जाणे.. डीजे नाईट ला कपल पासेस आणि त्यांची निर्लज्जपणे जाहिरात करून प्रवेश फी ठेवणारे निर्लज्ज आयोजक आणि कहर म्हणजे असल्या गोष्टी महाविद्यालयात करण्यास परवानगी देणारे लोक.असा नंगानाच करून पाश्चात्य संस्कृती रुजवण्याचे कामजर शाळा महाविद्यालये करणार असतील तर मात्र बाब निश्चितच गंभीर आहे. अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला क