Skip to main content

Posts

Showing posts from December 21, 2009

"भावनांचा चिखल.."

आज डोळे मिटून पडलो असताना अचानक डोक्यात विचारांचे काहूर उठलं.स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींभोवती फिरणारे हे जग स्वार्थाकडे वळताना पाहून जरा नाराज झालो.आपली मानसं,आपली संस्कृती या दोन गोष्टी आजकाल फक्त नावाला उरल्यासारख्या वाटतायेत.आपलं म्हणवून घेणार्यांनी,अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांनी 'आपल्याच माणसाचा' घात केल्याची उदाहरणे इतिहासात तर आहेतच पण जिवंत सुद्धा आहेत.बर्याचदा अशे प्रकार स्वार्थासाठीच घडतात. जीवास जीव देणारा मित्र असो,मोकळ्या मनाने काम करणारा कार्यकर्ता असो किंवा अगदीच आपली प्रेयसी वा प्रियकर करी असले तरी वेळ आपल्यावर प्रत्येकाचेच पाय पोटाकडे वळतात. वाळू देत , दुनियेचा नेमच तो पण वळताना इतरांना लाथाडू तरी नका. कृष्ण आणि सुदामा या दोन मित्रांची जोडी इतिहासात होऊन गेली.आज असे लोक नाहीत राहिले.राजकारणी असो, सामान्य माणूस , कॉर्पोरेट जगत कोणीच कोणाचा कायमस्वरूपी सखा बून राहत नाही.याला माणुसकीला लागलेली कीड म्हणावे का? सध्या अभियांत्रिकीच्या तिसर्या वर्षाला आहे मी.आयुष्यात पुढे जाईनही , तशी खात्री आहे.पण गेली १९ वर्षे या जगात वावरत असताना अगदी हाताच्या बोटावर