
व्यक्ती आणि त्यांची परस्पर विरोधी मने यांची सांगड घालणे हे आजच्या राजकारण्यांसाठी प्रमुख आव्हान आहे.राजकारण हा व्ययसाय झाला , त्यात सर्वसामान्यना स्थान नाही अशी ओरड करणार्या मध्यम वर्गाला आज आत्म् परीक्षण करण्याची नितांत गरज आहे.अर्थ व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेला स्वतः ला पंढरपेशी म्हणवणारा राजकारणाला शिव्या घालणारा मात्र निवडणुकीचा दिवशी घरी बसणारा हा मध्यम वर्गीय समाज.तसे पाहता योग्य राज्यकर्ते निवण्याची अचूक व योग्य असे काम करण्याची क्षमता याच वर्गात आहे. पण ती वापरली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
शिवाजी महाराज यांचा जय जय कार करताना अवघे आसमंत दनानून सोडणारा हा माझा महाराष्ट्र अटके पार झेंडे लावणारा हा महाराष्ट्र व इथला मराठी माणूस , जो स्वतः ची मान झुकावण्या पेक्षा छाटून घेणे पसंत करायचा , त्याची अवस्था आज काय झालीय ?कुठल्या संभ्रमात आहे तो?त्याच्या मनावर कसले मळभ चढलय त्याच्या ?लोक चंद्रावर जाऊन पोहोचले पण माझ्या या मराठी माणसाला अजुन स्वतः च्याच भूमिसाठी भांडायच येतय.का होताय अस? हा तरुण कुठला उपरा तर नही .
याला फक्त राज्यकर्ते नही तर आपणही तेवढेच कारणीभूत आहोत. अवघे आकाश कवेत घेण्याची आकांक्षा उरी बाळगून एखादा प्रगती पथवर जात असेल तर लगोलग त्याचे पाय ओढण्याचे प्रकारही आमच्याच मातीत होतात , हे सांगताना मला लाज वाटते.म्हणूनच की काय आजपर्यंत एकही मराठी मातीचा सुपुत्र या हिंदुस्तान च्या तख्त काबीज करू शकला नही... अथवा तख्त हलवून सोडू शकला नाही व बहुधा येत्या कित्येक वर्षांत तरी तशी पूसटशी ही चिन्हे मला दिसत नाहीत. न मग उगाच कशाला जीवाचा आटापिटा करत म्हणायचे की " दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा "??
आज गुंडा गिरी इतकी वाढली आहे कि महाराष्ट्राचा बिहार होतो कि काय किंवा झाला असावा , नव्हे झालाच आहे , अशी खंत मराठी मनाला लागल्याशिवाय राहत नाही.वॅलिंटाइन डे आणि फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा कॅरणारी आजची युवा पिढी महाराष्ट्र दिनी जागेवर असते का? शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे व म्हणायचे " राजे पुन्हा जन्माला या", अरे कशाला बोलावता ?? त्यानी त्यांच्या आयुष्यात अहोरात्र देह झिजवला तो या रयतेसाठी ना की एका जातीसाठी वा धर्मासाठी . मग त्यानी परत येऊन तुमचा नांगनाच पाहायचा की काय? की तुम्ही परलेल्या जातीयवदाचे उग्र रूप पाहायचे ??
अशा विविध प्रकारच्या समस्यांमधे भरडला जातोय तो ग्रामीण मराठी तरुण . त्याचे ते युवा मन , त्याची त्याची शिकून मोठे होण्याची असक्ती बर्याचदा पूर्ण होतच नाही. लाथ मारेल तेथे पाणी काढू अशी उमेद मनाशी बाळगणारा , पण त्याच वेळेस कुठे लाथ मारू अशा दुहेरी संभ्रमात असलेला हाच तो युवा वर्ग. जी विकासाची गंगा या जगात वाहत आहे , त्या गंगा मधील एक ओंजळ जरी या युवा वर्गास मिळाली तरी बघा हा युवा त्याचे तलाव निर्माण करतो की नाही ते.
पण शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी वाढत चाललीये . सधन आणि संपन्न असलेला शहरी भाग 'आपण भल आणि आपल कुटुंब भल ' अशा संकुचित चक्रात भरकटलेला आहे. राष्ट्र भावना हा प्रकारच लयास गेला आहे.राज्यकर्ते जरी बदलले तरी त्यांची घृणास्पद मनोवृत्ती वाढतच जाणार आहे.स्वतः च्या पुढच्या किती तरी पिढ्यांचे कमावून ठेवून इतर कितीतरी गरिबांच्या संसाराची राख रांगोळी करताना त्याना अजिबात शरम वाटत नाही.स्वच्छ प्रतिमा असलेले राज्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच. पण आहेत हे आपले नशीब आहे.
दुष्काळात जमीन पडिक पडते ,त्यातून उत्पन्न निघत नाही.त्याच प्रमाणे महाराष्ट्र व पर्यायाने भारत सध्या राष्ट्रा भावनेच्या दुष्कालातून जात आहे.येथे दैत्य मातला आहे. पण मला विश्वास आहे या युवा रक्तावर ज्याच्यामधे राष्ट्रभावना अंकुरली आहे.युवा भविष्य आहे या देशाचे.तो दिवस दूर नही,ज्या दिवशी या सगळ्या अन्याया विरूध्ध आवाज निघेल.प्रत्येकाच्या मनातून या व्यस्थेविषयी निघालेला नाराजीचा सूर सुध्दा एकदिवस "सिंहगर्जना" झाल्याशिवाय राहणार नही.
नक्कीच!
ReplyDeleteसिंहगर्जना होईलच. पण त्यासाठी आपल्या मराठी मनांना एकत्र यावेच लागेल.
आणि राजसाहेबांनी हा वसा घेतला आहे. पण सध्यातरी त्यांची ही भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.
बाकी, तुमचा लेख मला मनापासून आवडला.
मी पण काही लिहिले आहे.
बघा तुम्हाला काही पटते का ते.
http://gujgosti.wordpress.com
कॉंग्रेस चा मुळासकट नायनाट झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणे मुळीच शक्य नाही...
ReplyDeleteधन्यवाद ............!!
ReplyDelete