गेल्या काही दिवसात मराठी अस्मितेचा मुद्धा ऐरणीवर आलाय.गेली कित्येक दशके नुसती नावाला असलेली मराठी अस्मिता गेल्या दोन चार दिवसात अचानक पेटून उठलीय.दहा कोटी जनतेचा हामाझा महाराष्ट्र. सगळ्याना आपलेसे करणारा हा माझा महाराष्ट्र. सहकारची चळवळ फळफळलेला हा महाराष्ट्र.याच माझ्या महाराष्ट्रमधे असे किती तरी बाहेरून लोक आले. कितीतरी या मातीत मुरले.ते आमचेच झाले. अहो
पटेल काय आणि पाटील काय..आमचेच दोघे.सगळ्यानाच या मराठी मातीचा लळा.असणे गैर नाही हो.
असो जरा पहा माझ्या परीने या मराठी अस्मितेचे विश्लेषण......ज्या शिवाजी महाराजानी या रयतेच्या सुखासाठी,भल्यासाठी दिल्लीच्या तख्तला आव्हान दिले,आणि ते यशस्वीरित्या पेलले. आम्ही
सगळे त्याच शिवाजीचे मावळे.शून्यातून मराठी साम्राज्य उभा राहीले.स्वराज्य परकीयांच्या ताब्यात जाणे सोडा शत्रु वाकडी नजर करूनही पाहु शकत नव्हता.ज्या शंभू राजानी औरंगजेबाच्या तोंडाला फेस आणला,तेच आमचे
शंभू राजे सिंहाचे जीवन जगले,आणि धर्मासाठी प्राण देखील सोडला,पण धर्म नाही सोडला.......असा आहे आमचा तरुण. म्हणून त्याची छाती अजूनही फुगते राजांचे नाव निघाले की.
अंग डोलू लागते, बाहू स्फुरण पावतात त्या हिंदू नृसिंहाचा जय जय कार करायला.
"हिरकणी, तान्हूल पोर गडाच्या तळाला असताना जेव्हा गडाचे दरवाजे बंद झाले, तेव्हा ही माऊली जीवाची पर्वा न करता कडे कपारे उतरून गेली. फक्त ती तिच्या तान्ह्या पोरासाठी. याला
म्हणतात ममता, जिला आजही इतिहास वंदन करतो आणि एेणारी प्रत्येक पिढी वंदन करत राहील.अशा आहेत माझ्या मराठी भगिनी. आम्हाला आम्हाला अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा. आम्हाला अभिमान आहे
आमच्या इतिहासाचा.कारण ती आमची अस्मिता आहे.आमचा श्वास आहे.
गेल्या २ शतकांपूर्वी भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला.त्यानंतर स्वातंत्र्य लढा झाला भारत स्वातंत्र्य झाला.बराच अवधी उलटून गेला.संस्थाने खालसा झाली.जसा मराठा सामील झाला तसा राजपुतही या
भारतात सामील झाला.पण हा स्वातंत्र्य लढा झाला याचा अर्थ असा नव्हता की शिवाजी महाराजांच्या लढयाचा आम्हाला विसर पडला.आमच्या हृदयात मराठी अस्मिता ज्वलंत होती.महाराष्ट्र या भारताचा एक अविभाज्य घटक
झाला हे मान्य.पण बाहेरचे लोक(परप्रांतीय) येथे येत गेले. आम्ही त्याना आडवले नाही. कारण ते आम्हाला पटले नाही.ते येथे आले.आमच्यात मिसळले. येथे पसरले !!!
ते निवडणुकीत उभा राहीले, आम्ही आमचे नेतृत्व त्यांच्या हातात दिले.पण त्यानी आमचा विचार क्वचितच केला.आमचा वापर करून घेतला.आम्हाला हिणवले,आम्हाला उस्कावले.हे सगळे का केले
त्यानी, तर त्याना माहीतच नव्हता आमचा इतिहास किंवा माहीत असला तरी त्याना अप्रिय होता आमचा इतिहास.आणि मग आम्ही गप्प? हो राहिलो,गांधीजिणी दिलेल्या शिकवनुकीप्रमाणे त्यांच्या कडे न्याय मागत राहिलो.
पण त्यानी आमचे ऐकले नाही.
मग मात्र आमचे रक्त तापले, आणि त्याच वेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने आम्हाला आमचा आधुनिक तारणहार भेटला.ज्यानी आमच्या जखमंवर फुंकर मारली आणि आम्हाला आत्म्
विश्वास दिला.आमच्या हातात बळ आले.न जानो कुठली दैवी शक्ति आमच्यात संचारली आणि " शिवसेना " नावाचा आमचा आवाज या भारतात दुमदुमला.
परत काळाची पाने उलटली मराठी माणूस एकविसाव्या शतकात वावरू लागला.प्रगती करू लागला.विविध क्षेत्रांमधे चमकू लागला.पण परत एकदा "बाहेरचे" डोईजड होऊ लागलेत.आमच्या
मातृभाषेविषयी अपमान जनक शब्द वापरु लागले.प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष.पदोपदी मराठी अस्मिता धुलीला मिळवत त्यांचे खिसे त्यानी भरलेच पण इतरानी पण त्यांचेच अनुकरण सुरू केले.
मग आता परत एकदा "मराठी हिसका" दाखवण्याची गरज वाटली.ज्या बाळासाहेबानी आम्हाला हाक मारली,त्यांच्याच आधुनिक रूपाणी,राजसाहेबानी आमच्या वेदनेला साद दिली, आम्ही पण त्यांची
मग साथ दिली.
आम्ही अगदी योग्य केले,आणि त्या अबु आजमिच्या मुस्काटात राम कदम यानी वाजवली,नव्हे ,"या तमाम मराठी अस्मितेने त्या नालायक प्रवृत्तीच्या मुस्काटात वाजवली आहे".ही तर आता
खरी सुरूवात आहे,परत असे वागाल तर तुकडे करू.
जय महाराष्ट्र......
--माधव वणवे
AGADI YOGYA BOLALAT
ReplyDeleteati uttam farach chaan.
ReplyDeleteekach number....
Jai Maharashtra
आपला फोन नंबर पाठवणे माधव जी वणवे साहेब9967717171
ReplyDeleteHarrah's Cherokee Casino Resort - Mapyro
ReplyDeleteHotels Near Harrah's Cherokee 여수 출장마사지 Casino 포항 출장샵 Resort · Tropicana Cherokee · Harrah's Cherokee Hotel & Casino · 김제 출장샵 Harrah's Cherokee Casino Resort 수원 출장샵 · Best Western 남원 출장샵 North Carolina Casino