Skip to main content

"फुलपाखरू....."


माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं,
मी सवयीने मुठ वळणार इतक्यात विश्वासानं ते हसलं,
                    
मी फुलपाखराला त्याचं नाव गाव पुसलं,
स्वच्छंदी असं सांगून ते माझ्यातच रमलं,

आपलेपणाची,अस्तित्वाची मला ते सवय लावून बसलं ,
काळाच्या काही घटकातंच तयासाठी मन वेडावलं,

नेमेची येऊन त्याने प्रेमाचे बीज माझ्यात रोवलं,
अन मग माझंही त्याच्याशी खूपच चांगलं जुळलं,

कोणे एके दिवशी वाट पाहून थकलो , पण ते नाही फिरकून आलं,
त्याच्या अस्तित्वाला शोधता शोधता माझं काळीज मात्र फाटलं....

Comments

  1. Lucky Club Casino Site in Singapore,Singapore
    LuckyClub Casino is a popular Singapore online casino and sports betting website. Established in 2017, luckyclub.live they are one of the most well-known Singaporean online casino

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या

ती ९० मिनिटे...

"पायावर पायाची टाकून घडी बसली होती अशी बसंतात बहरलेली वेल जशी चेहरा असा जसा खुललेलं नाजूक फुल, तेजानं उमललेलं डोळे असे पाणीदार जसे पहिल्या प्रहरी पानावर अवतरले दवबिंदू त्या दवांत शिरणारी सूर्याची पहिली किरणे, त्यातून उमटणारा लख्ख प्रकाश, तशीच हो अगदी तशीच तुझ्या काळ्याभोर केसांची लकाकी पहावं आणि पहातच राहावं, असा आरस्पानी चेहरा पेपर, "फ्रांस" सगळं काही क्षेम माहित नाही, बहुतेक यालाच म्हणत असतील पाहताक्षणी होते ते प्रेम..."