आदरणीय प्रतिभाताई
तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले.
एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले.
महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय.
स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत्न केला. एक मागासवर्गीय असल्याने या गोष्टीच्या जेवढ्या यातना मला झाल्या त्यापेक्षा कितीतरी पटीने यातना कोर्टाचा हा निर्णय ऐकून झाल्या.
याची जाण आपणास चांगली असेल कि हे पुस्तक जर बाजारात आले तर येणाऱ्या पिढ्यांवर कुठले पाश्चात्य संस्कार रुजतील? त्यांनी कुठली संस्कृती जपावी? माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ताई , आम्हास या राजकारण्यांकडून काही होईल याची अपेक्षा नाही. तुम्हीही एक माता आहात , भारताच्या प्रथम नागरिक आहात , मराठी आहात , तुम्ही या निर्णयावर ठोक आदेश जारी करून या पुस्तकावर बंदी आणावी ही विनंती. असे जर आपण केलेत तर हा तमाम महाराष्ट्र आपला ऋणी राहील आणि महाराष्ट्रातल्या रणरागिणी हिरकणीशी नाते का सांगतात हे तमाम हिंदुस्तानास कळेल.
तुमचे आमचे नाते काय , जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद ताई,
आपला विश्वासू
माधव वणवे

अगदी योग्य केलेस
ReplyDeleteयाची दखल घेतली जावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना
जय शिवराय
..... अतिशय सुंदर ... लिहित राहा
ReplyDeleteMitra,hyaachaa kaahee upayog hoil ase vaatat naahee,
ReplyDeleteMaharashtrane,
jagaas anek ratne dilee,mahaarashtrane tyaanaa sarv sanmaan dilee pan tyaanee maharashtraas,
KURHADEECHA DAANDAA GOTAAS KAAL,
HYA MHANEECHEE NEHMEE ATHWAN KARUN DILEE.
Kharach khup Chan lihilay....
ReplyDeleteaaj Maharajana lokaani eka jati purat eka dharma puarat maryaadit thewalay..
ya warun mala "Atrenchyi" kawita athawali
Chaukatil putale ratri ekatra jamun ashru dhalatat..
ki kase tyaani pratek jatine watun ghetale aahe yababtit..
http://ransangram.blogspot.com