Skip to main content

खग्रास


  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो.

बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय.

आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये.

मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिवजयंती ३ वेळा साजरी करतो आपण. यातून धडा म्हणून आपल्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींची नोंद ठेवावी याहेतुने सुरु केलेले लिखाण खंडीत झाले. अल्पकाळाच्या घडामोडींचा मागमूस घ्यायलासुद्धा बराच वैचारिक संघर्ष करावा लागतो. Mind Fuck हा शब्द याला चपखल बसेल.

एका नव्या पर्वात जाताना आणि प्रोफेशनल आयुष्य सुरु करताना यात टिकण्यासाठी स्वतःशी संवाद हा लेखणीद्वारे सदैव साधला जावा हीच त्या
चिंतामणी चरणी प्रार्थना.
मर्यादेयम विराजते
-माधव वणवे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...

ती ९० मिनिटे...

"पायावर पायाची टाकून घडी बसली होती अशी बसंतात बहरलेली वेल जशी चेहरा असा जसा खुललेलं नाजूक फुल, तेजानं उमललेलं डोळे असे पाणीदार जसे पहिल्या प्रहरी पानावर अवतरले दवबिंदू त्या दवांत शिरणारी सूर्याची पहिली किरणे, त्यातून उमटणारा लख्ख प्रकाश, तशीच हो अगदी तशीच तुझ्या काळ्याभोर केसांची लकाकी पहावं आणि पहातच राहावं, असा आरस्पानी चेहरा पेपर, "फ्रांस" सगळं काही क्षेम माहित नाही, बहुतेक यालाच म्हणत असतील पाहताक्षणी होते ते प्रेम..."