आज डोळे मिटून पडलो असताना अचानक डोक्यात विचारांचे काहूर उठलं.स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींभोवती फिरणारे हे जग स्वार्थाकडे वळताना पाहून जरा नाराज झालो.आपली मानसं,आपली संस्कृती या दोन गोष्टी आजकाल फक्त नावाला उरल्यासारख्या वाटतायेत.आपलं म्हणवून घेणार्यांनी,अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांनी 'आपल्याच माणसाचा' घात केल्याची उदाहरणे इतिहासात तर आहेतच पण जिवंत सुद्धा आहेत.बर्याचदा अशे प्रकार स्वार्थासाठीच घडतात.
जीवास जीव देणारा मित्र असो,मोकळ्या मनाने काम करणारा कार्यकर्ता असो किंवा अगदीच आपली प्रेयसी वा प्रियकर करी असले तरी वेळ आपल्यावर प्रत्येकाचेच पाय पोटाकडे वळतात. वाळू देत , दुनियेचा नेमच तो पण वळताना इतरांना लाथाडू तरी नका.
कृष्ण आणि सुदामा या दोन मित्रांची जोडी इतिहासात होऊन गेली.आज असे लोक नाहीत राहिले.राजकारणी असो, सामान्य माणूस , कॉर्पोरेट जगत कोणीच कोणाचा कायमस्वरूपी सखा बून राहत नाही.याला माणुसकीला लागलेली कीड म्हणावे का?
सध्या अभियांत्रिकीच्या तिसर्या वर्षाला आहे मी.आयुष्यात पुढे जाईनही , तशी खात्री आहे.पण गेली १९ वर्षे या जगात वावरत असताना अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच चांगली माणसे भेटली.
काहींनी मला बर्याचदा धोका दिलाय , पुढेही देतील.पण सुदैव माझे मी त्यांच्यावर कमी अवलंबून असतो नाहीतर आतापर्यंत उध्वस्त झालो असतो.
स्वताच्या जातीचा ,स्वतःच्या संपत्तीचा ,स्वतःच्या नावाचा तर कधी कधी बौध्धिक संपत्तीचा माज चढलेले पाहिलेत.मी सगळ्याच बाबतीत त्यांच्या खूप मागे आहे.त्याचे कारण माझा आळस असू शकेल पण माझा स्वाभिमान मात्र नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
त्याग पण मी बर्याचदा केलाय , करताही राहीन.पण ज्याच्यासाठी त्याग करतो त्यालाच जर त्या त्यागाची जाणीव नसेल तर मी करणाऱ्या त्यागाला अर्थ तो काय??मी वागण्या व बोलण्यातून जसा वाटतो तसा मुळीच नाही.
मी जर एखाद्यासाठी त्याग करत असेल तर मी त्याच्याकडून आपुलकीची आशा करण्यात गैर ते काय? एखाद्या जिवलगाची पावले जर चुकीच्या दिशेने पडू लागली तर त्याला वेळीच सावध करणे मी माझे कर्तव्य मानतो.पण त्याला जर त्या मैत्रीची फिकीर नसेल , पळत्याच्या मागे जाण्याची इच्छा असेल तर मी जाऊ देणे योग्य ठरते का ?
अनुभव माणसाला बरेच काही शिकवतो.पण जेव्हा आपण इतरांचे रक्षण करण्यास पुढे जातो ,तेव्हा आपल माणूस जर आपल्याला शत्रू मनात असेल तर त्याचे रक्षण करण्यास सरसावलेल्या बाहुंमध्ये स्फुरण उरेल काय?त्याला आपण शत्रू वाटतो , तेव्हा जीव तीळतीळ तुट्ल्याशिवाय राहत नाही.त्याला तोच त्याच्या यशाचा राजमार्ग वाटत राहतो, आणि मला दिसत राहते ती फक्त ती एक काट्यांनी भरलेली वाट.मानसं इतकी स्वार्थी कशी होतात तेच कळत नाही.अशा वेळी भावनांचा चिखल होतो.अवकाशाला गवसणी घालण्याची भाषा करणारे त्या वेळेस पंख गळून गेल्यासारखे वाटतात.
लळा लावला असता तमाशातली बाई सुद्धा जीव ओवाळून टाकते मग आपण जीव कि प्राण मानलेली व्यक्ती का इतकी निष्ठुर होते?. प्रेम ओतले असता मुके जनावर सुद्धा माणसाळते , मग माणसे का अशी वागतात?
या भावनांच्या जंगलात मी हरवलोय. आणि हार सुद्धा मानलीये.
मी माधव वणवे...

This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete