Skip to main content

"भावनांचा चिखल.."


आज डोळे मिटून पडलो असताना अचानक डोक्यात विचारांचे काहूर उठलं.स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींभोवती फिरणारे हे जग स्वार्थाकडे वळताना पाहून जरा नाराज झालो.आपली मानसं,आपली संस्कृती या दोन गोष्टी आजकाल फक्त नावाला उरल्यासारख्या वाटतायेत.आपलं म्हणवून घेणार्यांनी,अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांनी 'आपल्याच माणसाचा' घात केल्याची उदाहरणे इतिहासात तर आहेतच पण जिवंत सुद्धा आहेत.बर्याचदा अशे प्रकार स्वार्थासाठीच घडतात.
जीवास जीव देणारा मित्र असो,मोकळ्या मनाने काम करणारा कार्यकर्ता असो किंवा अगदीच आपली प्रेयसी वा प्रियकर करी असले तरी वेळ आपल्यावर प्रत्येकाचेच पाय पोटाकडे वळतात. वाळू देत , दुनियेचा नेमच तो पण वळताना इतरांना लाथाडू तरी नका.
कृष्ण आणि सुदामा या दोन मित्रांची जोडी इतिहासात होऊन गेली.आज असे लोक नाहीत राहिले.राजकारणी असो, सामान्य माणूस , कॉर्पोरेट जगत कोणीच कोणाचा कायमस्वरूपी सखा बून राहत नाही.याला माणुसकीला लागलेली कीड म्हणावे का?
सध्या अभियांत्रिकीच्या तिसर्या वर्षाला आहे मी.आयुष्यात पुढे जाईनही , तशी खात्री आहे.पण गेली १९ वर्षे या जगात वावरत असताना अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच चांगली माणसे भेटली.
काहींनी मला बर्याचदा  धोका दिलाय , पुढेही देतील.पण सुदैव माझे मी त्यांच्यावर कमी अवलंबून असतो नाहीतर आतापर्यंत उध्वस्त झालो असतो.
स्वताच्या जातीचा ,स्वतःच्या संपत्तीचा ,स्वतःच्या नावाचा तर कधी कधी बौध्धिक संपत्तीचा माज चढलेले पाहिलेत.मी सगळ्याच बाबतीत त्यांच्या खूप मागे आहे.त्याचे कारण माझा आळस असू शकेल पण माझा स्वाभिमान मात्र नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
त्याग पण मी बर्याचदा केलाय , करताही राहीन.पण ज्याच्यासाठी त्याग करतो त्यालाच जर त्या त्यागाची जाणीव नसेल तर मी करणाऱ्या त्यागाला अर्थ तो काय??मी वागण्या व बोलण्यातून जसा वाटतो तसा मुळीच नाही.
मी जर एखाद्यासाठी त्याग करत असेल तर मी त्याच्याकडून आपुलकीची आशा करण्यात गैर ते काय? एखाद्या जिवलगाची पावले जर चुकीच्या दिशेने पडू लागली तर त्याला वेळीच सावध करणे मी माझे कर्तव्य मानतो.पण त्याला जर त्या मैत्रीची फिकीर नसेल , पळत्याच्या मागे जाण्याची इच्छा असेल तर मी जाऊ देणे योग्य ठरते का ?
अनुभव माणसाला बरेच काही शिकवतो.पण जेव्हा आपण इतरांचे रक्षण करण्यास पुढे जातो ,तेव्हा आपल माणूस जर आपल्याला शत्रू मनात असेल तर त्याचे रक्षण करण्यास सरसावलेल्या बाहुंमध्ये स्फुरण उरेल काय?त्याला आपण शत्रू वाटतो , तेव्हा जीव तीळतीळ तुट्ल्याशिवाय राहत नाही.त्याला तोच त्याच्या यशाचा राजमार्ग वाटत राहतो, आणि मला दिसत राहते  ती फक्त ती एक काट्यांनी भरलेली वाट.मानसं इतकी स्वार्थी कशी होतात तेच कळत नाही.अशा वेळी भावनांचा चिखल होतो.अवकाशाला गवसणी घालण्याची भाषा करणारे त्या वेळेस पंख गळून गेल्यासारखे वाटतात.
लळा लावला असता तमाशातली बाई सुद्धा जीव ओवाळून टाकते मग आपण जीव कि प्राण मानलेली व्यक्ती का इतकी निष्ठुर होते?. प्रेम ओतले असता मुके जनावर सुद्धा माणसाळते , मग माणसे का अशी वागतात?
या भावनांच्या जंगलात मी हरवलोय. आणि हार सुद्धा मानलीये.
मी माधव वणवे...

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिव...

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या...

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...