छत्रपती शिवाजी महाराज , म.फुले ,शाहू ,डॉ,बाबासाहेब आंबेडकर हे सगळे खरे तर महाराष्ट्राची ओळख जगाला करून दिलेले महापुरुष.परंतु यांचा महाराष्ट्र जातीयवादाने कसा पोखरला आहे याचा आढावा घेण्याचा केलेला हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न.
मराठी राजकारणावर प्रभाव असलेल्या प्रमुख जातींमध्ये मराठा , OBC , दलित , आणि ब्राह्मण या चार प्रमुख जातींचा समावेश होतो.या सगळ्याच जाती बर्याचदा त्या त्या समाजाच्या नेत्याच्या मागे सक्षमपणे उभा राहिल्या याची बरेच उदाहरणे देता येतील.तसेच या सगळ्या नेत्यांनीही त्या त्या समाजाला आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले.आणि त्यामुळे बर्याच पक्षांवर जातीचा शिक्का मारला गेला.

मराठा कार्ड:
स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीचे जाळे महाराष्ट्रात विणले गेले.या सहकारी संस्थांवर पहिल्यापासूनच मराठा समाजाचे वर्चस्व राहिले.आजही बरेचसे साखर कारखाने ,सहकारी बँका,संस्था यांचे कार्यकारी मंडळ हे मराठाच असल्याचे लक्षात येते.मराठबहूल प्रदेशात क्वचितच इतर समाजाचा नेता पुढे जाऊ शकला.आणि जरी गेला तरी बर्याचदा मराठा नेत्यांच्या हातातले बाहुले बनून राहिला.मराठा कार्ड वापरून मतांच्या धृविकरणाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांनी केली आणि आता त्याचा वापर शरद पवार यांच्याकडून केला जातो.याच राजकारणाला बर्याचदा बेरजेचे राजकारण असेही म्हटले जाते.
दलित नेते आणि आंबेडकरी चळवळ:
रामदास आठवले हे तसे तरुणपणात लढवय्ये नेते,यांची भाषणे आक्रमक , जनसंपर्क दांडगा ,उत्कृष्ट संघटन कौशल्य यामुळे त्यांचा जनाधार चांगला होता.पण या गट बाजीमुळे त्यांचे बळ फार कमी झाले.याचा परिणाम २००९ च्या लोकसभेत निळे वादळ अक्षरशः झोपले.लाचार ,स्वार्थीपणा या सगळ्या गोष्टीस कारणीभूत ठरला.हिंदू दलित आणि नाव बौद्ध
यांच्यातला छुपा संघर्ष बर्याचदा चव्हाट्यावर आलाय.
OBC राजकारणाचा उदय :
छगन भुजबळ हे माळी समाजाचे नेते,मोठा जनाधार,विकासकामे यामुळे प्रसिद्ध आहेत.तर बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे नेते.त्यांचे बीडवर असलेले वर्चस्व हे वंजारी समाजाच्या जोरावर आहे.त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने मराठा कार्ड चालवायचा बर्याचदा प्रयत्न केले पण अपयशी ठरला.
पश्चिम महाराष्ट्रात आढळणारा धनगर समाज मात्र सध्या नेतृत्व विरहित म्हनाबा लागेल.आण्णा डांगे यांच्यानंतर प्रभावी नेतृत्व त्यांच्यात उदयास आले नाही.राजकीयदृष्ट्या धनगर समाज सध्या तरी राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आढळते.या समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद हे धनगर समाजाचे आमदार गावडे यांच्याकडे देण्याच्या हालचाली होताना दिसतात.महादेव जानकर हे सुद्धा भविष्यात धनगर नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात.
मतांच्या धृविकरानासाठी झालेले प्रयत्न :
प्रत्येक समाजाला काहीतरी गोष्टीने एकत्र आणून त्यांचे राजकारण करण्याचे प्रयोग महाराष्ट्रात झाले.
विविध मराठा संघटना ,निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारकाचा प्रश्न,२००९ च्या लोकसभेच्या वेळेचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हे सगळे मतांच्या ध्रुवी करणासाठी केले गेलेले प्रयत्न.( लोकसभेच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने गोपीनाथ मुंडे ,समीर भुजबळ ,चंद्रकांत खैरे ,रामदास आठवले या इतर समाजाच्या नेत्यांची झोप उडाली होती.त्यात आठवले यांचा मात्र बळी गेला.)
समता परिषद हे छगन भुजबळ यांनी माळी समाजाच्या मतांच्या एकत्रीकरणासाठी केले गेलेले व्यासपीठ म्हणता येईल.पण सध्या तरी भुजबळ हे राष्ट्रवादीसोबत असल्याने तसेच धनगर समाज आघाडीला साथ देत असल्याने या वेळेस धृविकरानासाठी विशेष असे प्रयत्न केले गेले नाहीत.नाहीतर मागे समता परिषदेचा मेळावा घेऊन छगन भुजबळ यांनी पवार साहेबाना सूचक इशारा केला होता.त्यामुळे पवार साहेबांनी धोका पत्करला नाही.
अजून एक ध्रुवीकरण केंद्र म्हणजे "भगवान गढ".संत भगवान बाबा नावाचे एक वारकरी संप्रदायातील संत वंजारी समाजात होऊन गेले.त्यांची समाधी असलेले ठिकाण भगवान गढ (पाथर्डी,अहमदनगर) म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी वंजारी समाज बर्याचदा एकत्र होतो.भगवान बाबांवरील नितांत श्रद्धा व भक्तीचा उपयोग मतांच्या धृविकरानासाठी केला जातो.या ठिकाणी गोपीनाथ मुंडे बर्याचदा मेळावे घेतात.आणि या मागच्या मुंडे यांनी राजीनामा दिला होता त्यावेळेस या भगवान गडावरील ताकदीसमोर भाजप नेतृत्वाला झुकावे लागले होते.याचे कारण म्हणजे बीड,परभणी,नगर,उस्मानाबाद,सोलापूर येथे संख्येने बर्यापैकी असलेला वंजारी समाज.याचा धसका या विधान सभेच्या वेळेस बबनराव पाचपुते यांनी चांगलाच घेतला होता.

अशाप्रकारे महापुरुषांचे नाव वापरून, त्या महापुरुषांना त्या त्या जातीपुरते मर्यादित करून ,त्यांच्या विच्रानाचे आचरण कमी (अथवा नाहीच), यातून राजकारण केले जाते.राजकीय वर्चस्व असलेला मराठा , त्याला आव्हान देत राजकीय जाग आलेला OBC ,तर राजकीय वाट पूर्णपणे भरकटलेला दलित आणि हो काही प्रमाणात असलेला ब्राह्मण समाज असे एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र आज महाराष्ट्रात आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र
माधव वणवे..
जय हिंद जय महाराष्ट्र
माधव वणवे..
आजची परिस्थिती पाहता कोणत्याही एका जातीच्या जीवावर कोणी राज्याच्या राजकारणावर वर्चस्व स्थापन करू शकत नाही
ReplyDeleteमहापुरुषांचे नाव वापरून, त्या महापुरुषांना त्या त्या जातीपुरते मर्यादित kele aahe.
ReplyDeletehe khare aahe, yaa war Kusumagrajanchi ti athwate..
jewha putale, chaukaat basun gappa marataat ki...
"Shivaji mhane mi Marathyancha, Ambedkar mhane mi Dalitancha.. Fule mhane mi Malyaancha, Tilak mhane mi brahmanaacha.."
बाकीचे काय पण म्हणुदेत आपण म्हणा "शिवराय हे जगातील आदर्श व्यक्तिंचे आदर्श आहेत"
ReplyDelete