Skip to main content

"महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्वाचा पैलू::जातीयवाद"




छत्रपती शिवाजी महाराज , म.फुले ,शाहू  ,डॉ,बाबासाहेब आंबेडकर हे  सगळे  खरे तर महाराष्ट्राची ओळख जगाला करून दिलेले महापुरुष.परंतु यांचा महाराष्ट्र जातीयवादाने कसा पोखरला आहे याचा आढावा घेण्याचा केलेला हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न.
मराठी राजकारणावर प्रभाव असलेल्या प्रमुख जातींमध्ये मराठा , OBC , दलित , आणि ब्राह्मण या चार प्रमुख जातींचा समावेश होतो.या सगळ्याच जाती बर्याचदा त्या त्या समाजाच्या नेत्याच्या मागे सक्षमपणे उभा राहिल्या याची बरेच उदाहरणे देता येतील.तसेच या सगळ्या नेत्यांनीही त्या त्या समाजाला आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले.आणि त्यामुळे बर्याच पक्षांवर जातीचा शिक्का मारला गेला.

मराठा कार्ड:

स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीचे जाळे महाराष्ट्रात विणले गेले.या सहकारी संस्थांवर पहिल्यापासूनच मराठा समाजाचे वर्चस्व राहिले.आजही बरेचसे साखर कारखाने ,सहकारी बँका,संस्था यांचे कार्यकारी मंडळ हे मराठाच असल्याचे लक्षात येते.मराठबहूल प्रदेशात क्वचितच इतर समाजाचा नेता पुढे जाऊ शकला.आणि जरी गेला तरी बर्याचदा मराठा नेत्यांच्या हातातले बाहुले बनून राहिला.मराठा कार्ड वापरून मतांच्या धृविकरणाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांनी केली आणि आता त्याचा वापर शरद पवार यांच्याकडून केला जातो.याच राजकारणाला बर्याचदा बेरजेचे राजकारण असेही म्हटले जाते.

दलित नेते आणि आंबेडकरी चळवळ:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या हितार्थ निळे वादळ उभे केले.नंतर हीच चळवळ बर्याच गटा तटामध्ये विभागली गेली.बहुजन हितार्थ सुरु झालेली आंबेडकरी चळवळ मात्र निव्वळ स्वार्थाकडे झुकत गेली.त्यातले विविध गट म्हणजे रामदास आठवले गट ,प्रा.जोगेंद्र कवाडे गट, रा.सु .गवई गट,डॉ.प्रकाश आंबेडकर गट हे होय.आघाडी ,युतीच्या राजकारणात आघाडीच्या लोकांनी या निळ्या वादळाला बरोबर घेतले .यातील सर्वात मोठा गट म्हणजे आठवले गट.
रामदास आठवले हे तसे तरुणपणात लढवय्ये नेते,यांची भाषणे आक्रमक , जनसंपर्क दांडगा ,उत्कृष्ट संघटन कौशल्य यामुळे त्यांचा जनाधार चांगला होता.पण या गट बाजीमुळे त्यांचे बळ फार कमी झाले.याचा परिणाम २००९ च्या लोकसभेत निळे वादळ अक्षरशः झोपले.लाचार ,स्वार्थीपणा या सगळ्या गोष्टीस कारणीभूत ठरला.हिंदू दलित आणि नाव बौद्ध
यांच्यातला छुपा संघर्ष बर्याचदा चव्हाट्यावर आलाय.

OBC राजकारणाचा उदय :
सन १९८० ला व्ही.पी.सिंग यांनी मांडलेल्या मंडल आयोगाच्या काही तरतुदींमुळे OBC चे अस्तित्व जाणवू लागले.आज महाराष्ट्रात छगन भुजबळ ,गोपीनाथ मुंडे हे ताकदवान OBC नेते ,जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जातात.पवारांच्या 'मराठा कार्ड' ला शह देण्यासाठी मुंडे-महाजन जोडीने "मा-ध-वं" (माळी-धनगर-वंजारी) असे सूत्र काही काळ चालवले.माळी ,धनगर , वंजारी या OBC मधील प्रमुख जाती.
छगन भुजबळ हे माळी समाजाचे नेते,मोठा जनाधार,विकासकामे यामुळे प्रसिद्ध आहेत.तर बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे नेते.त्यांचे बीडवर असलेले वर्चस्व हे वंजारी समाजाच्या जोरावर आहे.त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने मराठा कार्ड चालवायचा बर्याचदा प्रयत्न केले पण अपयशी ठरला.
पश्चिम महाराष्ट्रात आढळणारा धनगर समाज मात्र सध्या नेतृत्व विरहित म्हनाबा लागेल.आण्णा डांगे यांच्यानंतर प्रभावी नेतृत्व त्यांच्यात उदयास आले नाही.राजकीयदृष्ट्या धनगर समाज सध्या तरी राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे आढळते.या समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद हे धनगर समाजाचे आमदार गावडे यांच्याकडे देण्याच्या हालचाली होताना दिसतात.महादेव जानकर हे सुद्धा भविष्यात धनगर नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात.

मतांच्या धृविकरानासाठी झालेले प्रयत्न :
प्रत्येक समाजाला काहीतरी गोष्टीने एकत्र आणून त्यांचे राजकारण करण्याचे प्रयोग महाराष्ट्रात झाले.
विविध मराठा संघटना ,निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारकाचा प्रश्न,२००९ च्या लोकसभेच्या वेळेचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हे सगळे मतांच्या ध्रुवी करणासाठी केले गेलेले प्रयत्न.( लोकसभेच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने गोपीनाथ मुंडे ,समीर भुजबळ ,चंद्रकांत खैरे ,रामदास आठवले या इतर समाजाच्या नेत्यांची झोप उडाली होती.त्यात आठवले यांचा मात्र बळी गेला.)
समता परिषद हे छगन भुजबळ यांनी माळी समाजाच्या मतांच्या एकत्रीकरणासाठी केले गेलेले व्यासपीठ म्हणता येईल.पण सध्या तरी भुजबळ हे राष्ट्रवादीसोबत असल्याने तसेच धनगर समाज आघाडीला साथ देत असल्याने या वेळेस धृविकरानासाठी विशेष असे प्रयत्न केले गेले नाहीत.नाहीतर मागे समता परिषदेचा मेळावा घेऊन छगन भुजबळ यांनी पवार साहेबाना सूचक इशारा केला होता.त्यामुळे पवार साहेबांनी धोका पत्करला नाही.
अजून एक ध्रुवीकरण केंद्र म्हणजे "भगवान गढ".संत भगवान बाबा नावाचे एक वारकरी संप्रदायातील संत वंजारी समाजात होऊन गेले.त्यांची समाधी असलेले ठिकाण भगवान गढ (पाथर्डी,अहमदनगर) म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी वंजारी समाज बर्याचदा एकत्र होतो.भगवान बाबांवरील नितांत श्रद्धा व भक्तीचा उपयोग मतांच्या धृविकरानासाठी केला जातो.या ठिकाणी गोपीनाथ मुंडे बर्याचदा मेळावे घेतात.आणि या मागच्या मुंडे यांनी राजीनामा दिला होता त्यावेळेस या भगवान गडावरील ताकदीसमोर भाजप नेतृत्वाला झुकावे लागले होते.याचे कारण म्हणजे बीड,परभणी,नगर,उस्मानाबाद,सोलापूर येथे संख्येने बर्यापैकी असलेला वंजारी समाज.याचा धसका या विधान सभेच्या वेळेस बबनराव पाचपुते यांनी चांगलाच घेतला होता.

अशाप्रकारे महापुरुषांचे नाव वापरून, त्या महापुरुषांना त्या त्या जातीपुरते मर्यादित करून ,त्यांच्या विच्रानाचे आचरण कमी (अथवा नाहीच), यातून राजकारण केले जाते.राजकीय वर्चस्व असलेला मराठा , त्याला आव्हान देत राजकीय जाग आलेला OBC ,तर राजकीय वाट पूर्णपणे भरकटलेला दलित आणि हो काही प्रमाणात असलेला ब्राह्मण समाज असे एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र आज महाराष्ट्रात आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र
माधव वणवे..

Comments

  1. आजची परिस्थिती पाहता कोणत्याही एका जातीच्या जीवावर कोणी राज्याच्या राजकारणावर वर्चस्व स्थापन करू शकत नाही

    ReplyDelete
  2. महापुरुषांचे नाव वापरून, त्या महापुरुषांना त्या त्या जातीपुरते मर्यादित kele aahe.

    he khare aahe, yaa war Kusumagrajanchi ti athwate..
    jewha putale, chaukaat basun gappa marataat ki...
    "Shivaji mhane mi Marathyancha, Ambedkar mhane mi Dalitancha.. Fule mhane mi Malyaancha, Tilak mhane mi brahmanaacha.."

    ReplyDelete
  3. बाकीचे काय पण म्हणुदेत आपण म्हणा "शिवराय हे जगातील आदर्श व्यक्तिंचे आदर्श आहेत"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिव...

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या...

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...