Skip to main content

Posts

"फुलपाखरू....."

माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं, मी सवयीने मुठ वळणार इतक्यात विश्वासानं ते हसलं,                      मी फुलपाखराला त्याचं नाव गाव पुसलं, स्वच्छंदी असं सांगून ते माझ्यातच रमलं, आपलेपणाची,अस्तित्वाची मला ते सवय लावून बसलं , काळाच्या काही घटकातंच तयासाठी मन वेडावलं, नेमेची येऊन त्याने प्रेमाचे बीज माझ्यात रोवलं, अन मग माझंही त्याच्याशी खूपच चांगलं जुळलं, कोणे एके दिवशी वाट पाहून थकलो , पण ते नाही फिरकून आलं, त्याच्या अस्तित्वाला शोधता शोधता माझं काळीज मात्र फाटलं....

"रेशीमस्मृती "

कधी कधी वाटत या जगापासून अलिप्त व्हाव , होऊनी अदृश्य तुझ्या श्वासा श्वासात रहाव, श्रावणातील भ्रमराप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर जावं, अन एकदाचं सूरवंट बनून तुझ्यात गुरफटून जावं , द्यावी श्वासांची आहुती , अन तुझ्या वाटेत रेशीम अंथरून जावं, पण तू ठेवशील का ते रेशीमधागे जपून ? जेव्हा होईल तुझ्या पायांना त्याचा मऊ मऊ स्पर्श , तेव्हा येईल न तुला माझी आठवण ? ठेवशील ना जाण याची , तुझ्याखातर मी त्यागलं फुल पाखराच जिणं ...                                                        

"एका स्वाधीन झालेल्या मनाची गोष्ट..."

 "एखादी खोलवर झालेली जखम ,      वेदनेचा आकंत करणारी जखम ,        आर्त किंकाळी फोडायला लावणारी जखम .          आणि अशा जखमेवर हळुवार मारलेली फुंकर .            ती फुंकर हवीहवीशी वाटणारी , पण क्षणभंगुर ,              वेदनेचा  विसर पाडणारा त्यातला आपलेपणा ."  " माणसाचे आयुष्य अगदी असेच, त्या दुखऱ्या जखमेसारखे.ज्याप्रमाणे ती जखम नकोशी असते तसेच आपले आयुष्य हि आपल्याला बऱ्याचदा नकोसे होते. अशा वेळेस सगळ्या सुखांचा उबग येतो , वीट येतो.तेव्हा गरज असते ती आपल्या कोणाची तरी. मग ती व्यक्ती आपली आई,वडील,मित्र-मैत्रीण,आणि बऱ्याचदा प्रेयसी-प्रियकर कोणीही असते.त्यांच्या सहवासासाठी मन मोहरून जाते."   " एख्याद्याचा लागलेला लळा,एख्याद्याची झालेली सवय,तो तुटताना अनेकदा नरकयातना होतात.ज्यांच्या अंगाखांद्यावर आपले  अवघे बालपण जाते,त्यांच्या पासून विभक्त होताना त्यांच्या डोळ्याती...

"होय हा लढा आमच्या मराठी अस्मितेचा...."

गेल्या काही दिवसात मराठी अस्मितेचा मुद्धा ऐरणीवर आलाय.गेली कित्येक दशके नुसती नावाला असलेली मराठी अस्मिता गेल्या दोन चार दिवसात अचानक पेटून उठलीय.दहा कोटी जनतेचा हा माझा महाराष्ट्र. सगळ्याना आपलेसे करणारा हा माझा महाराष्ट्र. सहकारची चळवळ फळफळलेला हा महाराष्ट्र.याच माझ्या महाराष्ट्रमधे असे किती तरी बाहेरून लोक आले. कितीतरी या मातीत मुरले.ते आमचेच झाले. अहो पटेल काय आणि पाटील काय..आमचेच दोघे.सगळ्यानाच या मराठी मातीचा लळा.असणे गैर नाही हो. असो जरा पहा माझ्या परीने या मराठी अस्मितेचे विश्लेषण......ज्या शिवाजी महाराजानी या रयतेच्या सुखासाठी,भल्यासाठी दिल्लीच्या तख्तला आव्हान दिले,आणि ते यशस्वीरित्या पेलले. आम्ही सगळे त्याच शिवाजीचे मावळे.शून्यातून मराठी साम्राज्य उभा राहीले.स्वराज्य परकीयांच्या ताब्यात जाणे सोडा शत्रु वाकडी नजर करूनही पाहु शकत नव्हता.ज्या शंभू राजानी औरंगजेबाच्या तोंडाला फेस आणला,तेच आमचे शंभू राजे सिंहाचे जीवन जगले,आणि धर्मासाठी प्राण देखील सोडला,पण धर्म नाही सोडला.......असा आहे आमचा तरुण. म्हणून त्याची छाती अजूनही फुगते राजांचे नाव...

कुठे जाणार ते ?

कुठे जाणार ते ? परवा कॉलेजला मार्केट यार्ड या परिसरातून जात होतो.घरातून लवकर निघालो होतो .पेपर सुरू असल्यामुळे आणि जरा अभ्यास झाला असल्याने मी जरा खुश होतो. जाताना असताना सहज डावीकडे असलेल्या झोपड पट्टी कडे लक्ष्य गेले . तर त्या झोपड पट्टी मधे एकाने छानसे दुकान थाटले होते. बघून जरा वेगळे वाटले कारण भाग तसा खूपच "स्लम " होता. नंतर कॉलेज ला गेलो .पेपर मधे जरा कौशल्य पणाला लागले. अवघड असल्याने फार काही चमत्कार करत नाही आले . असो .निराश मनाने परत येत होतो. येताना परत त्याच मार्केट यार्ड परिसरात ती घरे नव्हती. अतिक्रमणे म्हणून ती हटवली जात होती. साधारण २०० ते ३०० लोक रस्त्यावर आले होते. कोठून कुन्या गावाचे असतील हे लोक , आता कुठे जाणार , झोपनर कुठे असे एकामागून एक प्रश्न माझ्या मनाला स्पर्श करून गेले.कायद्यात बसणारी नाहीत , रस्त्याची शोभा वा शहराची शोभा यास्थी बाधा असणारी वगैरे सगळे ठीक आहे. पण शेवटी ती पण माणसेच आहेत ना? ती गरीब घरात जन्मली , किंवा कुठे तरी कमी पडली म्हणून त्याना कुत्र्याची पण किंमत नाही का? निष्ठुर पणे त्यांच्या घरावर चालणारे रोलर पाहून मन सुन्न झाले. त्या कुट...

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..."

व्यक्ती आणि त्यांची परस्पर विरोधी मने यांची सांगड घालणे हे आजच्या राजकारण्यांसाठी प्रमुख आव्हान आहे.राजकारण हा व्ययसाय झाला , त्यात सर्वसामान्यना स्थान नाही अशी ओरड करणार्‍या मध्यम वर्गाला आज आत्म् परीक्षण करण्याची नितांत गरज आहे.अर्थ व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेला स्वतः ला पंढरपेशी म्हणवणारा राजकारणाला शिव्या घालणारा मात्र निवडणुकीचा दिवशी घरी बसणारा हा मध्यम वर्गीय समाज.तसे पाहता योग्य राज्यकर्ते निवण्याची अचूक व योग्य असे काम करण्याची क्षमता याच वर्गात आहे. पण ती वापरली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. शिवाजी महाराज यांचा जय जय कार करताना अवघे आसमंत दनानून सोडणारा हा माझा महाराष्ट्र अटके पार झेंडे लावणारा हा महाराष्ट्र व इथला मराठी माणूस , जो स्वतः ची मान झुकावण्या पेक्षा छाटून घेणे पसंत करायचा , त्याची अवस्था आज काय झालीय ?कुठल्या संभ्रमात आहे तो?त्याच्या मनावर कसले मळभ चढलय त्याच्या ?लोक चंद्रावर जाऊन पोहोचले पण माझ्या या मराठी माणसाला अजुन स्वतः च्याच भूमिसाठी भांडायच येतय.का ह...